श्री इंद्रायणी देवी यात्रेची सुरुवात आश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच घटस्थापना यापासून सुरुवात होते. ही यात्रा अश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणून ओळखतो, या दिवसापर्यंत यात्रा असते.
या नवरात्र मध्ये सप्तमी म्हणजेच सातव्या माळी या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. याच दिवशी माळावर भव्य खुल्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी माळावर यज्ञाचे आयोजन केले जाते.
संपूर्ण नवरात्रीमध्ये श्री इंद्रायणी देवीच्या माळावर स्वतःचे सप्ताह आयोजन केले जाते. प्रत्येक दिवशी प्रसाद वाटपही केला जातो. तसेच नवरात्र झाल्यानंतर येणारी अश्विनी पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या दिवशी देखील भावी भक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवीच्या दर्शनासाठी येतात. याव्यतिरिक्त प्रत्येक सणाच्या दिवशी तसेच वर्षभर भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी श्री इंद्रायणी देवीच्या माळावर येत असतात. या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा अर्चना करून भाविक भक्त देवीला आपले मागणी सांगतात तसेच आपली मागणी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच नवस पूर्ण झाल्यानंतर माळला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. माळाच्या पायथ्याला असलेल्या खंडोबा मंदिरापासून ही प्रदक्षिणा सुरू होते व खंडोबा मंदिरापाशीच पूर्ण होते होते. प्रदक्षिणा अंदाजे 5 ते 6 किलोमीटर आहे.
No comments:
Post a Comment