॥ श्री इंद्रायणी देवीची कथा ॥
पहा श्री विश्वनाथ अण्णा , श्री गुलाब दादा जाधव आणि श्री बाबा नाना जाधव यांचा विडियो. आख्यायिका
ब्रम्हांड पुरानामध्ये सहयाद्री नावाचा खंड आहे. त्यामध्ये हि कथा आपल्याला पाहायला मिळते. चैवाष नावाचे एक ऋषी आपल्या आश्रमात दररोज प्रात : काळी उठून . स्नान ', पुजा, आरती व नित्यनियमाने पाठ घेत , रात्री सांय प्रार्थना घेत , असा त्यांचा दिनक्रम चालत असे . भगवंताचे तप, जप, ध्यान , समाधी ते करत होते .
एके दिवशी चैवाषऋषी रात्रीची सांय प्रार्थना करत असतांना .,त्यांच्या पत्नीच्या मनात पुत्र प्राप्तीची आभिलाषा उत्पन झाली . असा अवेळी पुत्र प्राप्तिच्या आभिलाषेपोटी दैत्य वृत्तीचा गोलका सुर नावाचा पुत्र झाला. पुढे याच गोलकासुरांने विष्णुची कठोर तपचर्या करून त्यांना प्रसन्न केले .भगवान विष्णु प्रसन्न होऊन त्याला इच्छा प्रगट करायला सांगीतली ' . तेंव्हा गोल कासुराने दोन वर मागीतले , मला पृथ्वीवर उड्डान करता यावे आणि सर्वात बलवान व्हावे. त्याने सर्व पृथ्वीपादाक्रांत करुन , मी सर्वश्रेष्ठ आहे असा गर्व त्याला झाला . येथुनच त्यांने सर्वसामान्यावर अत्याचार करायला सुरुवात केली .
त्यांनी ऋषींचे आश्रम , पवित्र ठिकाणीही अत्याचार करू लागला, त्याच्या वडिलांनीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . माञ अहंकार धुंदीमध्ये तो कोणाचे ऐकायला तयार नव्हता . त्याच्या या अत्याचाराला कंटाळून इंद्राने भगवान नृसिंहाच्या साह्याने "इंद्राणी ' " रुद्राणी ', वैष्णवी ( ब्रम्हाणी ) या शक्ति गोलका सुर चा वध करण्यासाठी निर्मान केल्या. शेवटी गोलाकासुरआणि तिन्ही शक्ती यांच्यामध्ये घणाघाती युद्ध झाले . त्यात दैत्य गोलकासुर मारल्या गेला .युद्ध झाल्यानंतर या तिन्ही शक्ती भगवान मलीकार्जुनIकडे गेल्या, त्यावेळी रक्ताने माखलेल्या या तिन शक्ती शुद्ध व पवित्र होण्यासाठी जवळच असलेल्या पविञ गोदावरी पात्रामध्ये स्नान करायला सांगीतले. भगवान मल्लीकार्जुन यांनी ,एक शक्ती वैष्णवीला उत्तरेस जायला सांगीतले .दुसरी शक्ती ब्रम्हाणीला दक्षीने स जायला सांगीतले, तिसरी शक्ती इंद्राणी ( इंद्रायणी )भक्तांचे रक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या माळावर पाठवले . पुढे भक्तांचे संरक्षणासाठी याच माळावर वास्थव्य केले .
या गोलकासुराचे शरीर पवित्र होत .कारण , चैवाषऋषीच्या सानिध्यात राहिल्याने ' ,मात्र डोक असुरी विचारांच., होत म्हणुन देविने शिरछेद करून त्यावर विराजमान झाली व भक्तांचे संरक्षण केले . गोलकासुराचे मुख म्हणजे आजची मंदीराची जागा होय . शरीर म्हणजे संपूर्न माळ आहे. आजही माळाला प्रदक्षणा घालण्याची प्रथा आहे .... कारण , मनातील मनोरथ व शरीरातील ईडापिडा जावू दे ! असा भक्तांचा- भाव आहे .......
copy and paste
No comments:
Post a Comment